
कोयना अभयारण्या मध्ये जाण्याचा बेत पक्का केला. मी,समीर,दुष्यंत आणि राहुल असे चार जण होतो. दिनांक २५-०१-२००१ ला निघण्याचे ठरले. ठरल्या दिवशी आम्ही भोर वरुन सातार्यला पोहोचलो,सकाळचे १० वाजले होते. २ वाजता गाडी होती बमनोली या गावाला जाण्यासाठी. तो पर्यंत जेवण तयार करण्याचे सगळे साहित्य विकत घेतले आणि गाडी ची वाट पाहु लगलो. २ ची गाडी ३ ला निघाली आणि ४:३० ला बामणोलि या गावात पोहोचली. त्याच दिवशी पुढे कुसापूर ला जाण्या साठी लॉंच नव्हती त्यामुळे आम्हाला गावा तील मन्दिरा मध्ये मुक्काम करावा लागला. सकाळी लवकर उठून तोंड वगैरे धुवून घेतले आणि शिवसगर जलाशयावर जाऊन सरकारी लॉंच ची वाट पाहु लागलो. तोड्या वेळातच लॉंच आली आणि आमचा कुसापूर चा २ तसचा प्रवास सुरू झाला..७ ला सुरू केलेला प्रवास ८:५० ला संपला. कुसापूर ला उतरलो, कपडे बदलून माडोशी मार्गे नागेश्वर चा रस्ता धरला एक मोठा टप्पा चढून आल्यावर एका छोट्याशा मन्दिर सदृश मोकळ्या जागी पोहोचलो तिथे थोडा वेळ विश्रांती साठी सगळे जन विसवले. मी झाडमध्ये आजूबाजूला काही दिसते का ते पाहु लागलो .. एखादा साप किंवा एखादा प्राणी दिसावा हीच इच्छा. एकदम माझे लक्ष एका मोठ्या पतंग कडे गेले . जवळ जवळ २० सेंटी मीटर चा तो मॉथ शांत पणे रात्र होण्याची वाट पाहत लपून बसला होता . त्याचे फोटो काढून आम्ही पुढचा रस्ता धरला . पुढील रस्ता गर्द झाडी तून होता. झाडी अगदी दाट म्हणजे उन्हाचा कवडसा ही जमिनीवर पोहोचणार नाही याची त्यानी पूर्ण पणे काळजी घेतली आहे. झाडी तून चालताना अजिबात उन्हा चा त्रास झाला नाही आणि अर्ध्या तासा मध्ये एका मोठ्या पठारावर पोहोचलो. गवताळ भागात एखादा गवा किंवा एखादे हरिण दिसते का ते शोधू लागलो पण व्यर्थ. पठारच्या एका टोकावर जाऊन खाली दिसणारी दरी न्याहाळु लागलो. एका गवताळ जागे मध्ये गवा चारतां नजरेस पडला. सगळे जण गवा पाहत बसले आणि उठून मी जरा डाव्या बाजूला चालत गेलो. समोर एक मोठे झाड होते कशाचे ते काही समजले नाही पण त्याच्या खाली काही तरी चरताना दिसले . नीट दुर्बिन लावून पाहिल्यावर कळले ते एक भेकर आहे... निवंता चरत होते . आमच्या पासून त्याचे अंतर जवळ जवळ १०० मी असेल. थोडे पुढे जाऊन पाहु असा विचार करून त्या दिशेने पुढे सरकू लागलो पण त्याला आमची चाहूल लागली व ते क्षणात जवळील झाडी मध्ये दिसेनासे झाले. चला पठारावर काही तरी दिसल्यामुळे सगळ्याना बरे वाटले. आता आपेक्षा वाढु लागल्या.. बिबट दिसावा , अस्वल दिसावे असे सगळे बोलू लागले .. विचार आणि डोळे उघडे ठेवून लगेच आम्ही पुढचा रस्ता धरला ... समोर नागेश्वर चा सुळका दिसू लागला. समोर दिसत असला तरी आंतर कमी नव्हते आणि रस्ता थोडा अवघड ही होता. सुळक्यच्या पलीकडे चिपळूण चा परिसर दिसता होता . आता सगळा रस्ता उताराचा आणि दरीच्या कडेकडेने होता. एका जागी तर फक्त २-३ फूटचा रस्ता आणि दोन्ही बाजूला दरी. जी दरी तीव्र उतारा ची नव्हती त्या बाजूला तोल देत देत आम्ही तो टप्पा पार केला. २:३० ला नागेश्वर मन्दिरा मध्ये पोहोचलो. थोडी विश्रांती घेऊन पाणी आणण्यासाठी कुंडा कडे जाऊ लागलो. कुंडा पुढे असणार्या दरी मध्ये एक गवा मादी आणि तिचे १ वर्षाचे पिल्लू चरताना दिसले. आमची चाहूल लागताच मादी नाराजीने मान हलवत झाडी मध्ये घुसली नि पिल्लू तिच्या मागे चालते झाले. आम्ही पाणी घेऊन गुहे मध्ये परतलो.. मसाले भात करण्याच्या तयारी ला लागलो. फक्कड चविष्ट मसाले भात खाऊन १० ला झोपलो. रात्री दुरून भेकर भुंकल्या चा आवाज दरी मध्ये घुमत होता. बिबट किंवा वाघ शिकारी ला निघाल्याची ती सूचनच होती. आवाज ऐकत ऐकत कधी झोप लागली कळले नाही . सकाळी ६ ला मला जाग आली.. समोर च्या झाडा मध्ये निळा शैल कस्तुर मस्त शिळ घालत होता. शिळ ऐकत ऐकत तोंड धुण्या साठी नशीब घेऊन जन्माला आलो होतो मी .... खूप मस्त वाटत होते.. तोंड धुवून झाल्या वर जरा दरी मध्ये काही दिसते का पाहण्या साठी गुहे बाहेर जाऊन दरी मध्ये नजर फिरवली.
दरी मध्ये डाव्या बाजूला एक गवा चारताना दिसला, नजरे समोर एक कृष्ण सार गरूड सकाळचा नाश्ता शोधण्यामध्ये मग्न होता.. गंमत म्हणजे तो जिथून जिथून उडत जाई त्या त्या झाडावर बसलेले शेकरू लगेच त्याच्या वर आपल्या आवाजाच्या गोळ्या मारत होते. ऐकायला खूप मज्जा येत होती हे सगळे. मी उठलो आणि गुहे चा रस्ता धरला. थोड्या वेळात सगळे उठले आणि तोंड धुवून रात्री राहिलेल्या मसाले भाता वर ताव मारला आणि ११:०० वाजता वासोटा गडाचा रस्ता धरला. हा रस्ता ७-८ किमी चा असेल.. अर्धा रस्ता पूर्ण पणे दरी च्या कडे कडेने होता. बरोबर फक्त पाण्याच्या बाटल्या आणि काही खाण्याचे पदार्थ होते.. आज पाठीवर काहीही ओझे नव्हते त्यामुळे चालायला काही त्रास होत नव्हता. थोडे चालल्या वर उजव्या बाजू च्या दरी मध्ये लाल तोंडच्या माकडा ची एक टोळी दिसली. आम्हाला पाहून सरळ ते दरी मध्ये उतरून गेले.
त्याचा म्होरक्या आम्हाला भीती दाखवण्यासाठी आ वासून आमच्या वर धावून येत होता. थोडा वेळा ने तो हि दरी मध्ये निघून गेला. आम्ही हि पुढे झालो . डाव्या दरी मध्ये एक घोरपड पाळताना दिसली. दरी च्या कडे कडे ने चालणारी वाट संपली. आणि आम्ही प्रवेश केला कोयने च्या घनदाट झाडी मध्ये.
जंगल मध्ये शांत पणे चालू लागलो. उंच च्या उंच झाडे आणि त्यावरून पाळणारे शेकरू दिसत होते. गडाचा पायथा ते गडाचा दरवाजा हे अंतर पूर्ण पणे दगड गोट्या ने भरलेली आहे. ती चढाई चढून वासोटा किल्या वर पोहोचलो. मागच्या वेळी मला समोर असलेल्या मारुती मन्दिर मागे आस्वल दिसले होते. त्यामुळे परत दिसेल या आशे वर शांत पणे चालत गेलो पण काहीही नाही. मारुती मंदिर च्या पलीकडे ताई तेलिनिचा वाडा आहे. आता फक्त चौथरा राहिला आहे. मारुती मंदिर च्या डाव्या बाजूचा रस्ता धरला आणि पाण्याच्या कुंडा पाशी पोहोचलो. कुंडा च्या शेजारी एक कलिंगडा चा वेल होता. त्याला २ कलिंगडे पण आली होती. कलिंगडे कच्ची होती तरीही आम्ही तशीच खाऊन घेतली आणि बाबू काड्या कडे कूच केले. बाबू काड्या वर पोहोचलो. विशाल, रुद्र, कठीण, काळाकभिन्न असा तो सह्याद्रीचा कडा समोर उभा होता. सुसाट वारे वाहत होते. कॅमेरच्या एका फ्रेम मध्ये त्याचे रुद्र रूप बसत नव्हते . थोडे फोटो काढून आम्ही परत तळ्य पाशी आलो.

तळ्य वर पोहोचलो आणि समोर असणार्या दरी कडे पाहु लागलो... समोर शिवसगर जलाशयाचा काही भाग दिसत होता. हिरवी गार झाडी समोर पसरली होती. वासोटा च्या समोर असलेली झाडी ही दाट असली तरी सलग असे मोठे जंगल नव्हते. डोंगरा वर झाडी ची ठिगळे लावल्यासारखे दिसत होते. दरी मध्ये डाव्या बाजूला एक गवा चारताना दिसला. गवा अगदी गडाच्या खाली म्हणजे ज्या रस्त्या वरुन परत नागेश्वर ला जायचे होते त्याच रस्त्याच्या जवळच तो चारात होता. त्याच्या जवळ जाऊन फोटो काढण्याचे ठरवले. शांत पणे गड उतरू लागलो. खाली अजुन गवा दिसत होता ... अगदी शांत पणे चालू लागलो. अगदी ५०-६० फुटा वर गवा आला. अजुन त्याला आमची चाहूल लागली नव्हती. त्याचा एक फोटो काढला लगेच त्याला आमची चाहूल लागली आणि तो सरळ कारवि च्या रानात घुसला. आम्ही ही नागेश्वर चा रस्ता धरला . मागे दिसलेला गवा पुन्हा वाटे मध्ये उभा राहून आमच्या कडे पाहत उभा होता. त्याने थोडा वेळ आम्हाला पहिले आणि आम्ही ही त्याला परत पाहून घेतले. त्याचे पाहून झाल्यावर तो झर झर पाऊले उचलत पुढे निघून गेला. आम्ही ही चालत राहिलो. थोड्या अंतरा वर पुन्हा तोच गवा. पुन्हा नागेश्वर च्या वाटेवर तोच गवा दत्त म्हणून समोर उभा. यावेळी त्याने एक मोठा हुंकर टाकला आणि सरळ पळत दरी मध्ये उतरला .. त्याच्या चालण्याने झुडपे आणि झाडे कडा कड आवाज करत तुटत होते. शांत झाडी मध्ये तो आवाज अजुन मोठा येत होता. काही वेळाने पुन्हा निरव शांतता पसरली आणि आम्ही पुढचा मार्ग धरला. ६ वाजता पुन्हा नागेश्वर ला पोहोचलो. लपवून ठेवलेल्या बॅगा काढल्या आणि गुहे मध्ये परतलो. पुन्हा रात्री च्या जेवणा ची म्हणजे फक्कड खिचडी ची तयारी केली. खिचडी करणे चालू असताना पाऊस कोसळू लागला. मस्त पावसाचा आवाज ऐकत ऐकत खिचडी खाऊन झोपी गेलो. सकाळी कुंडा पासून जो पाण्या चा प्रवाह जातो त्याच्यातून सरळ चालत जाण्याचा प्लान होता. सकाळी उठून तोंड वगैरे धुवून आम्ही न्याहारी ला रात्री राहिलेली खिचडी खाऊन घेतली आणि ११ ला पुन्हा जंगलाची वाट धरली.
रस्त्या मध्ये भरपुर फुलपाखरे दिसली. पक्षी दिसले.. रान कोंबंडयाचे थवे दिसले. वाटेत एक झुडूप पार करताना समीर आधी त्याच्या मागे दुष्यंत त्याच्या मागे मी आणि माझ्या मागे राहुल असा क्रम होता.. आम्ही तिघे पुढे झाल्या वर त्या झुडुपा मध्ये राहुल ला वळवळ जाणवली. तो होता एक हरणटोळ. चांगला ३ फुट लांबीचा होता,

उन्हाला आला असेल मोकळ्या जागेत. त्याला पकडून त्याचे फोटो सेशन झाले व त्याला त्याच्या जागी सोडून आम्ही पुढे निघालो.
पुढे एक पाण्याचे डबके दिसले, तिथेच लपून बसण्याचा विचार केला. पण तेवढ्यात पाऊस सुरू झाला. आम्ही एका खडकाचा आश्रय घेऊन बसून राहिलो. थोड्या वेळात पाऊस थांबला आणि आम्ही पुन्हा पाण्याच्या डबक्या जवळ जाऊन बसलो. काही वेळात आमच्या दिशेने काही आळ्या सरकू लागल्या. त्याना किती ही दूर ढकलले तरीही त्या आमच्या च दिशेने येवू लागल्या ... थोडा वेळ तिथेच बसून तिथून उठलो आणि वसोत्याच्या दिशेला असलेल्या जंगल मध्ये घुसलो. आता आम्ही पुन्हा वासोट्या च्या पायथ्याला पोहोचलो होतो. सरळ नागेश्वर च्या दिशेने चालण्यास सुरूवात केली . एका सपाटीला आल्यावर झाडी तून काही तरी पळत आल्याचा आवाज आला. अगदी आमच्या समोर एक सम्बर पळत येताना दिसले, त्याच्या मागे अजुन काही तरी पळत होते पण आमची चाहूल लागून ते तिथेच थांबले आणि सांबार सरळ खाली दरी मध्ये पळत गेले. मागे काय पळत आले हे पाहण्या साठी मी जरा पुढे जाऊन काही दिसते का ते पाहण्याचा प्रयत्न केला पण काहीही दिसले नाही. पुन्हा आम्ही सपाटीला आलो. तेवढ्यात माझ्या पायावर काही तरी वळवळ जाणवली, पॅंट वर करून पहिले तर एक जळू. लगेच तिला ओढून काढले. माझ्या अंगावर जळू म्हणजे इतरांच्या अंगावर ही असु शकते. आता सगळ्यानी कपडे काढण्यास सुरूवात केली आणि अंगा चा एक न एक भाग तपासायला सुरूवात केली. दुसरी जळू सापडली ती राहुल च्या बुटा मध्ये, आणि ती पहिल्या वर त्याची जी प्रतिक्रिया होती ती अजुन ही आमच्या मनात ताजीतवानी आहे.
त्याने मागचा पुढचा विचार न करता जळू ओढून काढली त्या सरशी रक्ता ची चिळकांडी माझ्या आंगा वर उडाली. ती जळू डबी मध्ये भरली. बाकी कोणाच्या अंगावर जळवा नव्हत्या. मघाशी ज्या आळया आमच्या दिशेने सरकत होत्या त्या सगळ्या जळवा होत्या हे कळले. जळु बरोबर घेऊन नागेश्वर चा रस्ता धरला . त्या जळु चे फोटो काढून तिला सोडून दिले. दुसर्या दिवशी परतीचा प्रवास करायचा होता आणि सगळे जाम दामले होते त्यामुळे रात्री फक्त नुडल्स केले. रात्री पासूनच पावसाला सुरूवात झाली. दुरून भेकरचे आवाज येऊ लागले. पाऊस आणि भेकर असे संगीत ऐकत झोपी गेलो.
सकाळ पासून च ढग दाटून आले होते. पटकन सगळे समान भरले आणि पाण्याच्या कुंडा चा रस्ता धरला... पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि माडोशी ची वाट धरली तेवढ्यात पावसाळा सुरूवात झाली . पावसाचा जोर चांगलाच वाढला , सगळी कडे धुके दाटून आले. आणि जस जसे वर वर चढत होतो तसतसे गार वारे अंगाला लागत होते. काही वेळातच पूर्ण भिजून गेलो. गार वार्या ने माझा कान दुखू लागला. वर पठारा वर पोहोचलो सगळी कडे दाट धुके. तिथे रस्ता चुकलो. पण लगेच रस्त्याला लागलो आणि झप झप पाऊले उचलत कुसापूर कडे कूच केले.१:३० ला कुसापूरला पोहोचलो. मोकळ्या मैदाना मध्ये कपडे बदलून घेतले. ऊन पडल्या मुळे जरा बरे वाटू लागले. माडोशीतील एका कुटुंबा ला आम्ही आमच्या कडे राहिलेले अन्न पदार्थ देऊन टाकले. जलाशयावर येऊन लॉंच ची वाट पाहु लागलो. पुन्हा २ तासा चा प्रवास करून बामणोलि ला पोहोचलो. तिथे पोहोचल्या वर कळले की सातार्या ला जायला आज बस नाही, पण आजच घरी पोहोचायचे ठरवले होते त्यामुळे मस्त पैकी चहा आणि बिस्कीटे खाऊन घेतली आणि सातार्या ला पायी जाण्यास निघालो. ३५ किमी. अंतर होते.

अर्ध्या तसा मध्ये मधून मधून चालत जाऊन ५ किमी चे अंतर पार केले. तेवढ्यात एक टेंपो आला. तो ही सातार्या ला जाणारच होता. बॅगा टेंपो मध्ये टाकून सातार्या मध्ये पोहोचलो. तिथून सगळे आपापल्या घरी सुखरूप परतले.
या ट्रेक मध्ये आम्हाला साप , निरनिराळे फुलपाखरे, अनेक शेकरू,गवे, सांबार, घोरपड अशा अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या.
खालील फोटो मध्ये कुठे काय दिसले ते सूचीत केले आहे.
Fakkad ahe re gadya tuze pravas varnan. ekandarit kamacha boja bharpur ahe ase disate. aso baki padya ani gadya donhi kshetranmadhe changali vatchal chalu ahe. pudhacya tappyasathi shubheccha !
ReplyDeleteKrupabhilashi,
Rahul Shilimkar
1001 no dile...Harantol cha photo lai khup bhari mast aala ahe...
ReplyDeleteThanks,
Praveenkumar Gaikwad